
चिमुकल्याच्या एका वाक्याने बदलापूर दुहेरी मृत्यू प्रकरणाला नवं वळण
जून 12, 2026 1 Min Read
ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील जुवेली गाव परिसरात एका बंद कारमध्ये महिला आणि ओला चालकाचे रक्तबंबाळ मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृतांची ओळख मनीषा भोसले आणि ओला चालक ज्योतिबा शिंदे अशी झाली आहे. दोघांच्या शरीरावर धारदार शस्त्राचे वार आढळल्याने पोलिसांनी दुहेरी हत्येच्या दृष्टीने तपास सुरू केला आहे.
घटनेवेळी कारमध्ये असलेल्या मनीषा भोसले यांच्या तीन वर्षांच्या मुलाने “आईला चालक काकांनी मारले” असे सांगितल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यानंतर चालकाचा मृत्यू कसा झाला, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून सीसीटीव्ही, तांत्रिक पुरावे आणि इतर माहितीच्या आधारे सर्व बाजूंनी तपास सुरू आहे.







