Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत योजनेवर ‘जिल्हा सनियंत्रण समिती’ची करडी नजर
गणेशोत्सवात आरोग्य शिबिरांचे आयोजन करा – जिल्हाधिकारी मनुज जिंदल
गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी
आंबव येथील अभियांत्रिकी महाविद्यालय परीक्षा केंद्राच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमान्यांचा ओघ
गणेशोत्सवात अ‍ॅक्वा लाइन मध्यरात्रीपर्यंत सुरू; शेवटची मेट्रो रात्री 12 वाजता
⁠देशभरातील बातम्या

ISROचा ‘तिसरा डोळा’ अंतराळात; EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण

सप्टेंबर 4, 2026 1 Min Read

भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने अंतराळ क्षेत्रात आणखी एक मोठी झेप घेत GSLV-F17 रॉकेटच्या मदतीने अत्याधुनिक पृथ्वी निरीक्षण उपग्रह EOS-05 चे यशस्वी प्रक्षेपण केले. आंध्र प्रदेशातील सतीश धवन अंतराळ केंद्रावरून झालेले हे प्रक्षेपण भारताच्या सुरक्षा आणि तंत्रज्ञान क्षमतेसाठी महत्त्वपूर्ण मानले जात आहे.

EOS-05 हा उपग्रह सुमारे 36,000 किमी उंचीवरून देशाचे सतत निरीक्षण करणार असून, जवळजवळ रिअल-टाइम इमेजिंग क्षमता असल्यामुळे सीमाभागांवर नजर ठेवणे अधिक अचूक आणि प्रभावी होणार आहे. त्यामुळेच या उपग्रहाला भारताचा ‘तिसरा डोळा’ असेही संबोधले जात आहे.

GSLV-F17 हे सुमारे 51.7 मीटर उंच आणि 420.5 टन वजनाचे शक्तिशाली प्रक्षेपण यान असून, या मोहिमेद्वारे GTO/सब-GTO कक्षेत प्रक्षेपित करण्यात आलेला हा आतापर्यंतचा सर्वात जड उपग्रह ठरला आहे. ही GSLV मालिकेतील 19 वी यशस्वी मोहीम आहे.

इस्रो प्रमुख डॉ. व्ही. नारायणन यांनी या यशाबद्दल समाधान व्यक्त करत, “हा देशासाठी अभिमानाचा क्षण आहे. काही मिनिटांच्या प्रक्षेपणामागे अनेक वर्षांची मेहनत असते,” असे सांगितले. मोहिमेचे संचालक थॉमस कुरियन यांनीही या प्रक्षेपणाला ऐतिहासिक ठरवले.

दरम्यान, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. जितेंद्र सिंह यांनी इस्रोच्या कामगिरीचे कौतुक करत, “भारत अंतराळ क्षेत्रात नवे उच्चांक गाठत असून जागतिक अंतराळ शक्ती म्हणून आपली ओळख अधिक मजबूत करत आहे,” असे म्हटले.

या यशस्वी मोहिमेमुळे भारताच्या संरक्षण, आपत्ती व्यवस्थापन आणि सीमाभागातील निगराणी क्षमतेत मोठी वाढ होणार आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

करबुडे हायवे परिसरात बेकायदेशीर गोवंश कत्तल उघड; दोन आरोपी ताब्यात

Next

गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरी बोटीत बिघाड; 38 जणांची सुखरूप सुटका

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech