Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
राज्यस्तरीय घडामोडी

मतदार यादी पुनरीक्षणात ‘मौजे टेरव बु.’चा विक्रम; महाराष्ट्रात पहिले गाव

जुलै 8, 2026 2 Min Read

    भारत निवडणूक आयोग आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या निर्देशानुसार संपूर्ण राज्यात मतदार यादीचा विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रम (SIR – Special Intensive Revision) राबवला जात आहे. या अंतर्गत चिपळूण तालुक्यातील ‘मौजे टेरव बु.’ या गावाने डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करत आपले काम १००% पूर्ण केले असून, हा बहुमान मिळवणारे ते महाराष्ट्रातील पहिले गाव ठरले आहे.

      या मोहिमेत ३० जून २०२६ ते २९ जुलै २०२६ या विहित कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकार्‍यांनी (BLO) घरोघरी भेटी देऊन हे पुनरीक्षण काम अत्यंत अचूकतेने पूर्ण केले आहे.

    जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांच्या नेतृत्वाखाली २६५ – चिपळूण विधानसभा मतदार संघाचे मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी आकाश लिगाडे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली या विशेष मोहिमेसाठी ‘मौजे टेरव बु.’ या गावाची निवड करण्यात आली होती. चिपळूणचे तहसीलदार प्रवीण लोकरे आणि निवडणूक नायब तहसीलदार रसिका रसाळ यांनी या संपूर्ण कामावर देखरेख ठेवली.

 या गावामध्ये एकूण १९५ मतदार असून, यामध्ये ९३ महिला मतदार आणि १०२ पुरुष मतदारांचा समावेश आहे. मोहिमेदरम्यान गावातील सर्वच्या सर्व १९५ मतदारांना गणना प्रपत्र (EF) चे वाटप करण्यात आले होते. यापैकी १८७ मतदारांचे गणना प्रपत्र ॲपद्वारे यशस्वीरीत्या डिजिटायझेशन करून ऑनलाइन नोंदवण्यात आले.

या विशेष मोहिमेत तांत्रिक अचूकता आणि पारदर्शकता राखण्यासाठी जमा न होण्याजोग्या (Uncollectable) ८ प्रपत्रांचे वर्गीकरण अत्यंत सखोलपणे करण्यात आले. यामध्ये गावातून २ मयत मतदार, ५ दुबार नोंदणी असणारे मतदार आणि १ कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या मतदाराची अचूक माहिती समोर आली असून, त्यानुसार कायदेशीर प्रक्रियेद्वारे मतदार यादी संपूर्णपणे निर्दोष व अद्ययावत करण्यात आली आहे.

       या ऐतिहासिक कामगिरीत सुप्रिया लोखंडे (तलाठी तथा BLO), आस्माकौसर राजअहमद देसाई (पर्यवेक्षक), नारायण चौधर (मंडळ अधिकारी), मधुरा विश्वनाथ साळवी (अंगणवाडी सेविका), सुहास मोहिते (पोलीस पाटील), शुभम उतेकर (ग्राम महसूल अधिकारी), अनिकेत शिर्के (महसूल सहाय्यक – निवडणूक शाखा) आणि ग्रामपंचायत टेरव बु. यांच्या संपूर्ण पथकाने अहोरात्र मेहनत घेतली. या अभूतपूर्व यशाबद्दल जिल्हा प्रशासनाकडून टेरव बु. गावाचे आणि संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे विशेष कौतुक होत आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

Jagar media in GJC

Next

‘शामराव पेजे महामंडळ’ची थेट कर्ज योजना; पात्र नागरिकांना अर्जाचे आवाहन

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech