
एसबीआयमध्ये मोठा घोटाळा उघड; ३०३ कर्मचाऱ्यांकडून ३११ कोटींची फसवणूक
जून 9, 2026 1 Min Read
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये (एसबीआय) धक्कादायक प्रकार समोर आला आहे. माहिती अधिकारातून उघड झालेल्या माहितीनुसार, गेल्या तीन वर्षांत ३०३ कर्मचाऱ्यांनी मिळून सुमारे ३११.०८ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे निष्पन्न झाले आहे.
या कालावधीत बँकेत हजारो फसवणुकीची प्रकरणे नोंदवली गेली असून सायबर फसवणुकीत मात्र घट दिसून आली आहे. एकूण फसवणुकीच्या घटनांमध्ये घट होत असली तरी कर्मचाऱ्यांच्या सहभागामुळे झालेल्या आर्थिक फटक्यामुळे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. ही माहिती माहिती अधिकारातून सामाजिक कार्यकर्ते अभय कोलारकर यांना मिळालेल्या कागदपत्रांमधून समोर आली आहे.







