

लांजाचा पाणीप्रश्न ऐरणीवर
लांजा नगरपंचायत हद्दीत मुंबई-गोवा महामार्गालगत महावितरणच्या ठेकेदारामार्फत सुरू असलेल्या विद्युत खांब उभारणीच्या कामामुळे पाणीपुरवठा यंत्रणेवर गंभीर परिणाम झाला आहे. मुख्य पाणीवाहिन्या वारंवार फुटून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्याने नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
भविष्यात नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामात अडथळे निर्माण होण्याची शक्यता व्यक्त करत नगरपंचायतीने वारंवार पत्रव्यवहार करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आली नसल्याचा आरोप प्रशासनाने केला आहे.







