
देशवासियांना महागाईचा आणखी एक झटका देत सरकारने घरगुती एलपीजी सिलिंडरच्या दरात २९ रुपयांची वाढ केली आहे. नवीन दरानुसार दिल्लीत १४.२ किलोच्या घरगुती सिलिंडरची किंमत ९१३ रुपयांवरून ९४२ रुपये झाली आहे. यापूर्वी व्यावसायिक सिलिंडरच्या दरात वाढ झाल्यानंतर आता घरगुती गॅसही महागल्याने सर्वसामान्यांच्या घरगुती बजेटवर ताण वाढणार आहे. दरम्यान, पेट्रोल, डिझेल आणि सीएनजीच्या किमतीतही सातत्याने वाढ होत असून वाढत्या इंधनदरांमुळे नागरिक आणि वाहतूक क्षेत्रात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.







