Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
एसटी महामंडळ आर्थिक संकटात; 3,771 कोटींच्या मदतीला ब्रेक
कुर्धेतील ‘त्या’ दुर्घटनाग्रस्त पुलाला मंजुरीच नव्हती
रत्नागिरीत मुंढे पॅटर्नचा धडाका
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
राज्यस्तरीय घडामोडी

राज्यात लम्पीविरुद्ध युद्धपातळीवर मोहीम

जून 11, 2026 2 Min Read

राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी पशुसंवर्धन विभाग सज्ज झाला आहे. सन २०२६-२७ या वर्षाकरिता आवश्यक असलेल्या गोटपॉक्स लसमात्रांचे उत्पादन ‘पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे’ येथे यशस्वीपणे सुरू झाले आहे. २१ व्या पशुगणनेनुसार राज्यातील जिल्ह्यानिहाय गोधनाची संख्या विचारात घेऊन, पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या ४०% म्हणजेच ३७ लाख ५२ हजार लसमात्रांचे वाटप नियोजनबद्ध रीतीने सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर, राज्यातील लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहीम युद्धपातळीवर व तातडीने पूर्ण करण्याचे आवाहन पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी केले आहे.
​लसीकरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्थेचे सहआयुक्त डॉ. याहयाखान पठाण यांनी जिल्हा उपआयुक्तांना महत्त्वपूर्ण सूचना दिल्या आहेत. क्षेत्रीय स्तरावर लस पोहोचवताना तिची ‘शीत साखळी’ कुठेही खंडित होणार नाही, याची काटेकोर दक्षता घेण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत. तसेच, लस प्राप्त होताच जिल्ह्यातील अधिक दूध देणाऱ्या व उच्च उत्पादनक्षमता असलेल्या पशूंना प्राधान्याने लस देण्यात यावी आणि लसीकरणाचा दैनंदिन अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करावा, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
​गतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात आढळून आला होता, त्या ‘हॉटस्पॉट’ भागांमध्ये प्राधान्य क्रमाने लसीकरण मोहीम राबवली जाणार आहे. या व्यापक मोहिमेसाठी जिल्ह्यातील सहकारी दूध संघ, स्वयंसेवी संस्था तसेच खाजगी पशुवैद्यक व सेवादाते यांचेही सक्रिय सहकार्य घेण्याचे आवाहन जिल्हास्तरीय यंत्रणेला करण्यात आले आहे.
​”लम्पी चर्मरोगासारख्या संसर्गजन्य आजारांपासून गोधनाची सुरक्षा करणे हे पशुसंवर्धन विभागाचे सर्वोच्च प्राधान्य आहे. पशुधन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आणि शेतकरी बांधवांचा मुख्य कणा असल्याने त्यांचे आरोग्य अबाधित राखण्यासाठी गोटपॉक्स लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय आहे. पशुपालकांनी या मोहिमेला पूर्ण सहकार्य करावे, असे डॉ. किरण पाटील, आयुक्त, पशुसंवर्धन विभाग यांनी सांगितले.
​पशुपालकांसाठी महत्त्वाची माहिती:
​टोल फ्री क्रमांक: १९६२ (एका कॉलवर घरपोच पशुवैद्यकीय उपचार उपलब्ध)
​प्राधान्य: अधिक दूध देणारी जनावरे आणि गतवर्षीचे प्रादुर्भावग्रस्त (हॉटस्पॉट) तालुके.
​लस निर्मिती: पशुवैद्यकीय जैव पदार्थ निर्मिती संस्था, पुणे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

दिल्ली प्रवासादरम्यान सुनेत्रा पवार यांच्या विमानात तांत्रिक बिघाड

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech