Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
अनिल मरकड यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी
रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल
कडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले
चिपळूणच्या तन्वीची जागतिक सुवर्णभरारी
परिसरातील चालू घडामोडी

रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू

जून 11, 2026 1 Min Read

खेड तालुक्यातील सुकवली येथील खडी क्रशर परिसरात घडलेल्या भीषण अपघातात डंपर चालक नितीन विजय पवार (वय 27, रा. चिंचघर-दस्तुरी)चा दुर्दैवी मृत्यू झाला. रिव्हर्स घेत असताना चालकाचा अंदाज चुकल्याने डंपर सुमारे 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डंपर क्रमांक MH 08 W 8471 हा सुकवली परिसरातील खडी क्रशर येथे काम करत असताना चालकाने वाहन रिव्हर्स घेतले. मात्र, रिव्हर्सचा योग्य अंदाज न आल्याने डंपर अचानक रस्त्यालगतच्या सुमारे 30 ते 35 फूट खोल दरीत कोसळला. अपघात इतका गंभीर होता की चालकाला गंभीर दुखापत झाली.
घटनेची माहिती मिळताच भरणे नाका पुलाखाली तैनात असलेली जगद्गुरु रामानंदाचार्य श्री नरेंद्राचार्यजी संस्थान, नाणीजधाम यांची 24 तास विनामूल्य अपघात मदत रुग्णवाहिका तत्काळ घटनास्थळी दाखल झाली. रुग्णवाहिका चालक सुरज हंबीर यांनी जखमी चालकाला तातडीने बाहेर काढून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी येथे दाखल केले.
मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीअंती चालक नितीन विजय पवार (वय 27, रा. चिंचघर-दस्तुरी) यांना मृत घोषित केले. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास संबंधित यंत्रणांकडून सुरू आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech