

1.23 कोटींच्या डिजिटल अरेस्ट फसवणुकीचा पर्दाफाश
रत्नागिरी सायबर पोलिसांनी डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 1 कोटी 23 लाख रुपयांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी मुख्य आरोपी गगनदीप भारद्वाज याला दिल्ली-नोएडा परिसरातून अटक करण्यात आली असून न्यायालयाने चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तांत्रिक तपास आणि गुप्त माहितीच्या आधारे सायबर पोलिसांनी आरोपीचा माग काढून ही कारवाई केली. पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने ही यशस्वी कारवाई केली.







