
गेटवे ऑफ इंडियाजवळ फेरी बोटीत बिघाड; 38 जणांची सुखरूप सुटका
September 4, 2026 1 Min Read

मुंबईत गुरुवारी रात्री गेटवे ऑफ इंडियाजवळ अरबी समुद्रात ‘अनवारी’ फेरी बोटीत तांत्रिक बिघाड झाल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. बोटीत 34 प्रवासी आणि 4 क्रू मेंबर्स असे एकूण 38 जण होते.
घटना सुमारे रात्री 8.30 वाजता, गेटवेपासून सुमारे 1.5 नॉटिकल मैल अंतरावर घडली. इंजिन बंद पडल्याने बोट खोल समुद्रात अडकली. मात्र, तात्काळ मदत पोहोचल्याने मोठी दुर्घटना टळली.
दुसरी रेस्क्यू फेरी घटनास्थळी दाखल होत खराब बोट जेट्टीपर्यंत ओढून आणली. सर्व प्रवासी सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झाली नाही.
मुंबई पोलिसांनी प्राथमिक तपासात तांत्रिक बिघाड कारणीभूत असल्याचे सांगितले असून, बोटीच्या फिटनेस व सुरक्षा उपायांची चौकशी सुरू आहे.







