
ST प्रवाशांसाठी NCMC कार्ड सक्तीला विरोध; स्थगितीची मागणी
September 4, 2026 1 Min Read

१ सप्टेंबर २०२६ पासून एसटी बस प्रवाशांसाठी NCMC (National Common Mobility Card) कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला विरोध होत आहे. सर्व्हर डाऊन, तांत्रिक बिघाड आणि अपुऱ्या कार्ड वितरणामुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असल्याचे सांगण्यात येत आहे.
या परिस्थितीमुळे वाहकांवर अतिरिक्त ताण येत असून, इंटक संघटनेने परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे या निर्णयाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी केली आहे. अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे.







