
तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय; जंक फूडवर बंदी, पालकांकडून स्वागत

तुकाराम मुंढेंचा कडक निर्णय; जंक फूडवर बंदी, पालकांकडून स्वागत
विद्यार्थ्यांच्या आरोग्याला प्राधान्य देत शाळांमधील जंक फूडवर बंदी घालण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय एफडीए आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. या निर्णयाचं राज्यभरातील पालकांकडून जोरदार स्वागत होत आहे.
शाळा आणि शाळेपासून 50 मीटर परिसरात जास्त मीठ, साखर, संतृप्त चरबी आणि ट्रान्स फॅट (HFSS) असलेल्या अन्नपदार्थांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये चॉकलेट, कोल्ड्रिंक्स, चिप्स, समोसा, वडे, भजी यांसारख्या पदार्थांचा समावेश आहे.
याऐवजी शाळांमध्ये फळे, भाज्या, कडधान्ये, संपूर्ण धान्यांपासून बनवलेले पदार्थ, दूध आणि स्थानिक पौष्टिक अन्नपदार्थ उपलब्ध करून देण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
“खाऊची दुकानं दिसली की मुलांचा हट्ट वाढतो आणि त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे हा निर्णय अत्यंत योग्य आहे,” अशी प्रतिक्रिया अनेक पालकांनी व्यक्त केली.
“आज कुणीतरी धाडस दाखवलं, तुकाराम मुंढे यांच्यासारखे अधिकारी प्रशासनात असायला हवेत,” असंही पालकांनी सांगितलं.एफडीएचे प्रमुख आदेश
शाळा व 50 मीटर परिसरात जंक फूड विक्रीवर बंदीजंक फूडच्या जाहिरातींवरही पूर्ण बंदीसर्व बोर्डांच्या शाळांना नियम लागू गोड व खारे पदार्थ, तळलेले खाद्यपदार्थ विक्री बंद फळे, भाज्या, कडधान्ये, दूध व पौष्टिक अन्नाला प्रोत्साहन नियम मोडल्यास शाळा, कॅन्टीन चालक व विक्रेत्यांवर कारवाईशाळांना ‘ईट राईट स्कूल’ म्हणून विकसित करण्यासाठी विशेष भर देण्यात आला आहे. एफडीएकडून वर्षातून किमान दोन वेळा अन्न तपासणी केली जाणार असून प्रत्येक शाळेत फूड सेफ्टी सुपरवायझर नियुक्त करणे बंधनकारक करण्यात आले आहे. शाळांमध्ये शुद्ध पिण्याचे पाणी आणि स्वच्छ स्वयंपाकगृह ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे.
एकंदरीत, विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा टप्पा मानला जात असून, पालकांनीही त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
.







