Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
अनिल मरकड यांची अखेर मृत्यूशी झुंज अपयशी
रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल
कडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले
चिपळूणच्या तन्वीची जागतिक सुवर्णभरारी
2 आठवड्यात हद्दपारीची प्रलंबित प्रकरणे निकाली काढा -जिल्हाधिकारी मनुज जिंदल
मान्सून रेंगाळला; राज्यावर उष्णतेचे सावट
राज्यस्तरीय घडामोडी

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

जून 9, 2026 2 Min Read

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्यादित, जिल्हा कार्यालय रत्नागिरी यांच्यामार्फत सन २०२६-२७ या आर्थिक वर्षात अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी विविध स्वयंरोजगार कर्ज योजना राबविण्यात येत आहेत. या अंतर्गत ५० टक्के अनुदान योजना, बीजभांडवल योजना आणि १ लाख थेट कर्ज योजना राबविल्या जात असून, इच्छुकांनी महामंडळाच्या https://mahadisha.mpbcdc.in/login या संकेतस्थळावर त्वरित ऑनलाईन अर्ज सादर करावेत, असे आवाहन महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक यांनी केले आहे.
​या सर्व योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत आणि महामंडळामार्फत राबविल्या जात असून, यासाठी अर्जदाराने यापूर्वी महामंडळाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
​योजनांचे स्वरूप खालीलप्रमाणे:
​१) ५० टक्के अनुदान योजना:
​प्रकल्प मर्यादा: रुपये ५०,०००/- पर्यंत.
​अनुदान: प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त रुपये २५,०००/- पर्यंत महामंडळाकडून अनुदान दिले जाते.
​बँक कर्ज: उर्वरित रक्कम बँकेमार्फत कर्ज स्वरूपात दिली जाते, ज्यावर बँकेच्या नियमानुसार व्याज आकारले जाईल.
​२) बीजभांडवल योजना:
​प्रकल्प मर्यादा: रुपये ५०,००१/- ते रुपये ५ लाखांपर्यंत.
​महामंडळ सहभाग (बीजभांडवल): प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द.सा.द.शे. व्याजदराने दिले जाते (या राशीमध्ये महामंडळाच्या रुपये ५०,०००/- अनुदानाचा समावेश आहे).
​बँक कर्ज: ७५ टक्के रक्कम बँकेमार्फत कर्ज म्हणून दिली जाते.
​परतफेड व इतर: कर्ज परतफेड ३ ते ५ वर्षांच्या आत समान मासिक हप्त्यांमध्ये करावी लागते. यामध्ये अर्जदाराचा स्वतःचा सहभाग ५ टक्के असणे आवश्यक आहे.
​३) १ लाख थेट कर्ज योजना:
​प्रकल्प मर्यादा: रुपये १ लाख पर्यंत.
​रचना: महामंडळाचा सहभाग रुपये ४५,०००/- (४ टक्के व्याजदर), महामंडळाचे अनुदान रुपये ५०,०००/- आणि अर्जदाराचा स्वतःचा सहभाग रुपये ५,०००/- अशी या योजनेची रचना आहे.
​परतफेड: या कर्जाची परतफेड ३६ महिन्यांच्या (३ वर्ष) आत करणे बंधनकारक आहे.
​अर्ज करण्यासाठी आवश्यक पात्रता व कागदपत्रे:
​पात्रता: अर्जदार अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील असावा. ५० टक्के व बीजभांडवल योजनेसाठी वय १८ ते ५० वर्षे, तर थेट कर्ज योजनेसाठी वय १८ ते ४५ वर्षे असावे. ग्रामीण व शहरी दोन्ही विभागांसाठी वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये ३ लाखांपर्यंत असावी. अर्जदार थकबाकीदार नसावा.
​आवश्यक कागदपत्रे: सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा व उत्पन्नाचा दाखला, पासपोर्ट आकाराचे फोटो, रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, रहिवासी प्रमाणपत्र, ओळख व पत्त्याचा शासकीय पुरावा (उदा. आधार कार्ड प्रत), व्यवसायाचे कोटेशन आणि आवश्यकतेनुसार प्रकल्प अहवाल (Project Report).
​व्यवसायानुरूप इतर दाखले: व्यवसाय जागेचा पुरावा, वाहन किंवा इतर तांत्रिक व्यवसायासाठी आवश्यक लायसन्स, परमिट, बॅच नंबर, बँक खाते क्रमांक आणि बँक पासबुकची झेरॉक्स प्रत.
​महत्त्वाची सूचना:
​ऑनलाईन अर्ज सादर केल्यानंतर अर्जदारांनी आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून अर्जाच्या तीन प्रती मूळ कागदपत्रांसह स्वतः महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, जिल्हा कार्यालय रत्नागिरी येथे उपस्थित राहून सादर कराव्यात. त्रयस्त व्यक्ती किंवा कोणत्याही मध्यस्थामार्फत आलेले कर्ज अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, याची नोंद घ्यावी.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

विधानपरिषद सदस्य निवडीचे अनिकेत तटकरे यांना प्रमाणपत्र

Next

इंधन मागणीत उसळी; पेट्रोल-डिझेल विक्रीने मोडले विक्रम

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'….च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय असं बरंच काही एकाच व्यासपीठावर...

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech