Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
एसटी महामंडळ आर्थिक संकटात; 3,771 कोटींच्या मदतीला ब्रेक
कुर्धेतील ‘त्या’ दुर्घटनाग्रस्त पुलाला मंजुरीच नव्हती
रत्नागिरीत मुंढे पॅटर्नचा धडाका
कॉक्रोच जनता पार्टीचा एल्गार, अभिजित दिपके यांचा आक्रमक पवित्रा
रिव्हर्स घेताना अंदाज चुकला; डंपर 35 फूट दरीत कोसळून चालकाचा मृत्यू
जगबुडी नदीच्या डोहात काळाचा घाला; तिघा भावांचा मृत्यू
Breaking News

रत्नागिरी आरटीओच्या ‘वायुवेग’ची धडक कारवाई; ३.३३ कोटी दंड वसूल

June 10, 2026 2 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यातील अपघातांना आळा घालणे आणि वाहतुकीला शिस्त लावण्याच्या हेतूने उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (RTO) वायुवेग पथकाने वर्षभरात धडक कारवाई केली आहे. माहे एप्रिल २०२५ ते माहे मार्च २०२६ या आर्थिक वर्षात या पथकाने एकूण ५,८१४ दोषी वाहनांवर कायदेशीर कारवाई करत ३ कोटी ३३ लक्ष ४३ हजार रुपये दंड आणि १८.४४ लाख रुपये कर असा एकूण कोट्यवधी रुपयांचा महसूल वसूल केला आहे.

सद्यस्थितीत रत्नागिरी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वायुवेग पथकामध्ये ५ सर्वसाधारण इंटरसेप्टर वाहने आणि १ अत्याधुनिक रडार यंत्रणेने सुसज्ज असे इंटरसेप्टर वाहन कार्यरत आहे. ही वाहने स्पीडगन, ब्रेथ अ‍ॅनालायझर (मद्यप्राशन तपासणी यंत्र) व इतर आधुनिक उपकरणांनी सुसज्ज असून, त्यांच्या माध्यमातून मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर थेट व अचूक कारवाई केली जात आहे.
​या संपूर्ण मोहिमेत सर्वाधिक दंडवसुली ही नियमबाह्य माल वाहतूक करणारे ट्रक, टिप्पर आणि ट्रेलर इत्यादी वाहनांकडून करण्यात आली आहे. नियमापेक्षा जास्त माल वाहून नेणाऱ्या (ओव्हरलोड) ३५५ वाहनांवर कारवाई करून पथकाने १ कोटी १३ लक्ष ५९ हजार रुपयांचा घसघशीत दंड वसूल केला आहे.
अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवरही आरटीओने कडक पावले उचलली आहेत:
​प्रवासी बस व खासगी वाहने: ४२५ प्रवासी बस आणि ७२ खासगी वाहनांवर कारवाई करून २६.८८ लाख रुपये दंड व २२.७२ लाख रुपये कर वसूल करण्यात आला.
​रिक्षा: वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या ७७ रिक्षांकडून ३ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल झाला.
​स्कूलबस: विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी तडजोड करणाऱ्या ५५ दोषी स्कूलबसवर कारवाई करून ३ लाख ८१ हजार रुपये दंड आणि १२ हजार रुपये कर वसूल करण्यात आला.
​वाहतुकीच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या चालकांवर वायुवेग पथकाने नोंदवलेले गुन्हे आणि वाहनांची संख्या पुढीलप्रमाणे आहे:
विस्कळीतपणा / नियमांचे उल्लंघन कारवाई झालेली वाहने
विना हेल्मेट दुचाकी चालक १४३०
ओव्हरस्पीड (वेग मर्यादा ओलांडणे) १३२२
पीयुसी (PUC) नसलेली वाहने१२८०
योग्यतेचे प्रमाणपत्र (Fitness) संपलेली वाहने११७६
विना विमा प्रमाणपत्र (Insurance) धावणारी वाहने१०९७
विना अनुज्ञप्ती (Driving License) वाहन चालवणे६०४
रिफ्लेक्टरशिवाय धावणारी वाहने ४९४
गाडी चालवताना मोबाईलचा वापर २३८
विना सीटबेल्ट वाहन चालवणे२१५
ट्रिपल सीट दुचाकी चालक ६३
वाहनामध्ये विनापरवानगी बदल करणे (Modifications)४८
तपासणी मोहीम तीव्र राहणार: आरटीओंचे आवाहन
​रत्नागिरी जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करणे आणि महामार्गासह अंतर्गत रस्त्यांवरील वाहतूक सुरक्षित व शिस्तबद्ध करणे हाच या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. ही तपासणी मोहीम यापुढेही अशीच सातत्याने आणि अधिक तीव्रतेने चालू राहणार आहे. त्यामुळे सर्व वाहनधारक, वाहतूकदार आणि चालकांनी वाहन चालवताना वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून करण्यात आले आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

कडक उन्हामुळे शाळांचे वेळापत्रक बदलले

Next

जागर इंट्रो

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech