
कर्जतमधील ३२ हजार झाडांच्या कत्तलीविरोधात राज ठाकरे आक्रमक; प्रकल्पस्थळी दिली भेट
October 28, 2026 1 Min Read

कर्जत येथे प्रस्तावित ३,००० मेगावॅट पम्प्ड स्टोरेज प्रकल्पासाठी सुरू असलेल्या वृक्षतोडीच्या ठिकाणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी भेट दिली. या प्रकल्पासाठी तब्बल ३२,४९० झाडे तोडली जाणार असल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक ग्रामस्थांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. यावेळी राज ठाकरे यांनी जमीन गमावण्याची आणि विस्थापित होण्याची भीती असलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला. प्रकल्पाचे काम सुरू करण्यापूर्वी आदिवासी आणि ग्रामसभेच्या सदस्यांशी कोणतीही सल्लामसलत करण्यात आली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. हजारो झाडांची तोड आधीच झाल्याचा दावा मनसे नेते अविनाश जाधव यांनी केला आहे. यावेळी बाळा नांदगावकर, अविनाश जाधव आणि संदीप देशपांडे यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते.





