
वेळणेश्वर येथे अभियांत्रिकीच्या २० वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू; गुहागर पोलिसांकडून तपास सुरू
October 22, 2026 1 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या अंजली अमोल पाटील (वय २०, मूळ रा. कराड, सातारा) या विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना २० ऑक्टोबर रोजी रात्री उघडकीस आली. अंजली ही शिक्षणासाठी ओझरवाडी येथे भाड्याच्या खोलीत राहत होती. मंगळवारी रात्री सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास ती खोलीत मृतावस्थेत आढळली. घटनेची माहिती मिळताच घरमालकाने पोलिसांना कळवले, त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अंजलीच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, गुहागर पोलीस पुढील तपास करत आहेत.







