Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
Breaking News

पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभचे उद्घाटन

September 29, 2026 2 Min Read

 रत्नागिरी : “भविष्यात केवळ पदवी उपयोगी पडणार नसून ‘स्कील’ (कौशल्य) हेच खरे भविष्य ठरणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि नव्या तंत्रज्ञानाच्या या युगात युवकांनी आपली कौशल्ये सातत्याने अपग्रेड (कौशल्य वृद्धी) करणे अत्यंत गरजेचे आहे,” असे प्रतिपादन जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी केले.

    जिल्हा कौशल्य विकास व रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र व गोगटे जोगळेकर महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभचे उद्घाटन येथील गोगटे जोगळेकर महाविद्यालयात जिल्हाधिकारी श्री. जिंदल यांनी केले. यानंतर ते उपस्थित तरुण, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

  यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जीवनप्रवासातील अनुभव सांगत युवकांना प्रेरित केले. एका छोट्या गावातील सामान्य कुटुंबातून ते जिल्हाधिकारी पदापर्यंतचा प्रवास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. “सुरुवातीला हिंदी माध्यमातून शिक्षण झाल्यानंतर इंग्रजीत जुळवून घेताना अपयश आले, मात्र चिकाटी, सातत्य आणि शिस्तीच्या जोरावर नवीन कौशल्ये शिकत मी पुढे गेलो,” असे सांगत त्यांनी ‘द अ‍ॅटोमिक हॅबिट्स’ या पुस्तकाचा संदर्भ देत दररोज केवळ १% प्रगती करत राहिल्यास चक्रवाढ पद्धतीने मोठे यश संपादन करता येते, हे स्पष्ट केले.

फक्त नोकरदार न राहता उद्योजक व्हा

 जिल्हाधिकारी श्री. जिंदल म्हणाले, “आज विविध कंपन्यांमध्ये तंत्रज्ञ किंवा इतर पदांवर नोकरीची सुरुवात करताना केवळ वेतनावर समाधानी न राहता कामातील बारकावे आणि तंत्रज्ञान शिका. डेल (Dell) कंपनीचे उदाहरण देत ते म्हणाले, मायकेल डेल यांनी तंत्रज्ञ म्हणून सुरुवात केली आणि आज शेकडो अब्ज डॉलर्सची कंपनी उभी केली. तसेच प्रत्येकाने स्वतःमधील क्षमता ओळखून भविष्यात उद्योग सुरू करण्याचा विचार केला पाहिजे. नोकरी करता करता दिवसातील किमान एक तास स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी द्यावा.”

शासकीय योजनांचा लाभ घ्या

  तरुणांना उद्योग सुरू करण्यासाठी भांडवलाची अडचण येऊ नये म्हणून, शासनाच्या सीएमईजीपी, पीएमईजीपी यांसारख्या अनेक कर्ज आणि अनुदान योजना उपलब्ध आहेत. युवकांनी इंटरनेट व ऑनलाईन माध्यमांचा सकारात्मक वापर करून नवीन ज्ञान आत्मसात करावे आणि शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचे भविष्य उज्ज्वल करावे, असा सल्लाही त्यांनी दिला.

  विद्यार्थ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या या सकारात्मक आणि वास्तववादी मार्गदर्शनाचे टाळ्यांच्या गजरात स्वागत केले.

कौशल्य आत्मसात करून ‘जॉब क्रिएटर’ बनावे – प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर

   “महाविद्यालयीन शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्याचे साधन नसून, विद्यार्थ्यांना सक्षम, आत्मविश्वासपूर्ण आणि रोजगारक्षम बनविण्याचे प्रभावी माध्यम आहे. आजच्या बदलत्या औद्योगिक युगात केवळ शैक्षणिक गुणवत्ता पुरेशी नसून विद्यार्थ्यांनी संभाषण कौशल्य, तांत्रिक व डिजिटल कौशल्ये, तसेच सकारात्मक दृष्टिकोन आत्मसात करणे काळाची गरज आहे. केवळ नोकरी शोधणारे न राहता तरुणांनी उद्योग जगताकडे वळून नोकऱ्या देणारे (जॉब क्रिएटर) व्हावे,” असे मार्गदर्शन गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी केले.

    प्राचार्य डॉ. साखळकर म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सुरू असलेल्या सेवा, विकास आणि युवा सक्षमीकरण या संकल्पनेच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. ‘आत्मनिर्भर भारत’ आणि ‘विकसित भारत’ घडवण्यासाठी तरुणांमधील कल्पकता, कौशल्य आणि उद्योजक वृत्ती अत्यंत महत्त्वाची आहे.”

    या मेळाव्यात सुमारे २३ नामांकित कंपन्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या माध्यमातून विद्यार्थ्यांना विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींशी थेट संवाद साधण्याची आणि स्वतःमधील क्षमता सादर करण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. विद्यार्थ्यांनी स्टार्टअप्स, नवनिर्मिती आणि स्वयंरोजगार या संकल्पना समजून घेऊन स्वतःच्या उन्नतीसोबतच समाज व राष्ट्राच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

   कार्यक्रमाच्या सुरुवातीला दीप प्रज्ज्वलन करण्यात आले. सहाय्यक आयुक्त दत्ता चव्हाण यांनी स्वागत, प्रास्ताविक करुन विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या. या मेळाव्यात विविध क्षेत्रांतील नामांकित कंपन्या उपस्थित होत्या.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे : आमदार योगेश कदम यांचे आश्वासन

Next

आरटीओ कार्यालयाकडून दुचाकी वाहनांसाठी ‘MH-08-BP’ ही नवीन मालिका सुरू

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech