
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात कोल्हापूर खंडपीठात याचिका; SIR प्रक्रिया थांबवण्याची मागणी

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात रत्नागिरीचे प्रथमेश गवाणकर यांनी ॲड. असीम सरोदे यांच्या मदतीने याचिका दाखल केली आहे.
या याचिकेत SIR प्रक्रियेबाबत गंभीर आक्षेप नोंदवण्यात आले आहेत. एकूण १४ निर्णयांवर दोन निवडणूक आयुक्तांनी आक्षेप घेतले असतानाही त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रक्रियेत कायदेशीर नियमांचे पालन झाले नसल्याचे याचिकेत नमूद आहे.
याचिकेत राज्यातील SIR प्रक्रिया तात्काळ स्थगित करण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीतून वगळण्यात आलेल्या मतदारांची नावे पुन्हा समाविष्ट करण्याचे निर्देश देण्याची विनंती न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून पुढील सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.







