Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
Breaking News

‘लोकसंवाद -२०२६’ कार्यक्रमात सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती

September 21, 2026 2 Min Read

रत्नागिरी : सध्याच्या डिजिटल युगात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला असला, तरी त्यासोबत सायबर गुन्हेगारीचे मोठे संकटही उभे राहिले आहे. स्मार्टफोन वापरताना नागरिकांनी विशेषतः ज्येष्ठ नागरिकांनी अत्यंत सतर्क राहिले पाहिजे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले. एका विशेष कार्यक्रमात उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय अंतर्गत जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने प.पू. बाळसत्याधारी महाराज व्यसनमुक्ती सेवा केंद्र खेडशी येथे सार्वजनिक गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘लोकसंवाद 2026’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प.पू.बाळ सत्याधारी महाराज, मिरजोळेचे उपसरपंच राहूल पवार, माय भारतचे जिल्हा युवा अधिकारी सम्राट पाटील, खेडशीचे माजी सरंपच भिकाजी गावडे, उद्योजक अरविंद माने, मुख्याध्यापक सुभाष पाटील आदी उपस्थित होते.
जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी लोकसंवाद 2026 याबाबत सविस्तर माहिती दिली. यानंतर सायबर गुन्ह्यांविषयी जनजागृती करण्यात आली. सायबर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक श्रीमती सुतार यांनी सायबर गुन्हेगारांच्या विविध क्लृप्त्या उलगडून दाखवल्या. त्या म्हणाल्या, “अनोळखी क्रमांकावरून येणारे मेसेज, संशयास्पद लिंक्स किंवा व्हॉट्सॲपवर येणाऱ्या कोणत्याही अनधिकृत गोष्टींवर क्लिक करू नका. एका क्लिकमुळे तुमच्या संपूर्ण मोबाईलचा ताबा सायबर गुन्हेगारांकडे जाऊ शकतो. बँक खात्यांची माहिती, वैयक्तिक छायाचित्रे आणि आधार कार्डसारखी ओळखपत्रे सायबर गुन्हेगारांच्या हाती लागल्यास त्याचा गैरवापर करून बनावट खाती सुरू केली जातात किंवा आर्थिक फसवणूक केली जाते.”
त्यांनी पुढे डिजिटल अरेस्ट, बनावट पोलीस अधिकारी बनून धमकावणे, शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या नावाखाली होणारी कोट्यवधी रुपयांची फसवणूक, गॅस बिल भरण्याचे खोटे मेसेज आणि इन्स्टंट लोन ॲप्सच्या माध्यमातून होणारे ब्लॅकमेलिंग याविषयी रत्नागिरी व परिसरातील घडलेल्या प्रत्यक्ष घटनांची उदाहरणे देऊन माहिती दिली. अशा कोणत्याही धमक्यांना किंवा आमिषांना बळी न पडता कुटुंबीयांशी संवाद साधावा, असा सल्ला त्यांनी दिला.
फसवणूक झाल्यास ‘१९३०’ वर संपर्क साधा
कोणत्याही प्रकारची सायबर किंवा आर्थिक फसवणूक झाल्यास नागरिकांनी अजिबात वेळ न दवडता तत्काळ शासनाच्या १९३० या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा किंवा थेट सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क करावा, जेणेकरून खात्यातून गेलेली रक्कम तत्काळ गोठवून (फ्रीझ करून) वाचवता येऊ शकेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. तंत्रज्ञानाचा वापर करताना सजगता आणि सुरक्षितता बाळगणे हीच सायबर गुन्ह्यांपासून बचावाची गुरुकिल्ली असल्याचे श्रीमती सुतार यांनी अधोरेखित केले.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

सात्विणगाव (खेड) येथे निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन

Next

जिल्ह्यातील सर्व न्यायालयांमध्ये १ ऑक्टोबरपासून ‘मेडीएशन फॉर नेशन ३.०’ विशेष मोहीम

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech