

महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष ॲड. दीपक पटवर्धन यांना ‘सहकार गौरव पुरस्कार 2026’ देऊन सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
सहकार क्षेत्रातील मोलाचे योगदान आणि नेतृत्वाची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला असून कार्यक्रमास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या पुरस्कारामुळे सर्व स्तरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.







