Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
Breaking News

गोवंशीय तस्करीविरोधात रत्नागिरी पोलिसांची मोठी मोहीम; चार भरारी पथके सक्रिय

July 1, 2026 1 Min Read

रत्नागिरी : गोवंशीय हत्या, अवैध वाहतूक व मांस विक्रीसारख्या गुन्ह्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस दलाने विशेष प्रतिबंधात्मक मोहीम सुरू केली आहे. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या मार्गदर्शनाखाली चार भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. २३ मे २०२६ पासून कार्यान्वित झालेल्या या पथकांमार्फत जिल्ह्यात गस्त, छापेमारी व तपासणी सुरू असून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जात आहे. आवश्यकतेनुसार मकोका अंतर्गतही कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. या विशेष मोहिमेचे नोडल अधिकारी म्हणून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच गावपातळीवर माहिती संकलन अधिक प्रभावी करण्यासाठी जिल्ह्यातील सर्व पोलीस पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, स्थानिक पातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर विशेष भर दिला जाणार आहे. खेड, चिपळूण, रत्नागिरी आणि राजापूर-लांजा या चारही पोलीस उपविभागांमध्ये स्वतंत्र भरारी पथके कार्यरत असून, संशयित हालचालींवर सतत लक्ष ठेवले जात आहे.

गोवंशीय तस्करी किंवा अवैध कृत्यांविषयी माहिती मिळाल्यानंतर तातडीने कारवाई करण्यासाठी या पथकांना आवश्यक अधिकार देण्यात आले आहेत. नागरिकांनी अशा बेकायदेशीर प्रकारांची माहिती डायल ११२ वर देण्याचे आवाहन पोलिसांनी केले असून माहिती देणाऱ्यांची ओळख गोपनीय ठेवली जाणार आहे.
Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

जेष्ठ रंगकर्मी आणि दिग्दर्शिका विजया मेहता काळाच्या पडद्याआड; कला विश्वात हळहळ

Next

रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पाऊस; सरासरी पर्जन्यमान 95.87 मिमी

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech