

संगमेश्वर तालुक्यातील काटवली गावचा सुपुत्र व आयटीआयचा माजी विद्यार्थी सुजित जाधव याची स्पेनमधील आंतरराष्ट्रीय पॅसेंजर शिप कंपनीत ‘असिस्टंट प्लंबर’ पदावर निवड झाली आहे. त्याला प्रतिमहा एक लाखांहून अधिक वेतन मिळणार असून या यशामुळे संपूर्ण तालुक्याचा गौरव वाढला आहे.
त्याने पुढे आवाहन केले की, आजच्या प्रगत युगात टिकून राहण्यासाठी आणि स्वतःची प्रगती साधण्यासाठी तरुणांनी व्यावसायिक शिक्षण देणाऱ्या ‘आय.टी.आय.’ सारख्या संस्थांमध्ये प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले पाहिजे. तेथून योग्य कौशल्य आत्मसात करून आपण जागतिक स्तरावर प्राविण्य मिळवू शकतो, हा विश्वास त्याने व्यक्त केला. श्री. जाधव याच्या या यशामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याधारित शिक्षणाविषयी एक नवा उत्साह निर्माण झाला आहे.







