

आषाढी एकादशी 25 जुलै 2026 रोजी असून यंदाच्या वारीचे अधिकृत वेळापत्रक जाहीर झाले आहे. संत ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पालख्या पारंपरिक उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत. 24 जुलै रोजी पालख्या पंढरपूरात दाखल होतील, तर 25 जुलै रोजी मुख्य सोहळा पार पडेल.
प्रमुख वेळापत्रक-
तुकाराम महाराज पालखी (देहू): 7 जुलै 2026 प्रस्थान
ज्ञानेश्वर महाराज पालखी (आळंदी): 8 जुलै 2026, दुपारी 3 वाजता प्रस्थान
पंढरपूर आगमन: 24 जुलै 2026
आषाढी एकादशी: 25 जुलै 2026
ज्ञानेश्वर माऊली पालखी – मुक्काम
8 जुलै – आळंदी
9-10 जुलै – पुणे
11-12 जुलै – सासवड
13 जुलै – जेजुरी
14 जुलै – वाल्हे
15 जुलै – लोणंद (नीरा स्नान)
16 जुलै – तरडगाव
17 जुलै – फलटण
18 जुलै – बरड
19 जुलै – नातेपुते
20 जुलै – माळशिरस
21 जुलै – वेळापूर
22 जुलै – भंडीशेगाव
23 जुलै – वाखरी
24 जुलै – पंढरपूर
रिंगण सोहळे-
16 जुलै – उभे रिंगण (तरडगाव)
20 जुलै – गोल रिंगण (माळशिरस)
21 जुलै – गोल रिंगण (वेळापूर)
22 जुलै – गोल रिंगण (भंडीशेगाव)
23 जुलै – उभे रिंगण (वाखरी)
24 जुलै – उभे रिंगण (पंढरपूर प्रवेश)
वारकरी मोठ्या भक्तिभावाने वारीत सहभागी होणार असून, राज्यभरात उत्साहाचे वातावरण आहे.







