
नागपूर : राज्य सरकारने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करत विश्वास नांगरे पाटील यांची नागपूरच्या नव्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती केली आहे. अडीच वर्षांहून अधिक काळ आयुक्त म्हणून कार्यरत असलेले रविंद्र कुमार सिंगल यांची बदली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अपर पोलीस महासंचालकपदी करण्यात आली. तसेच अमरावतीचे पोलीस उपायुक्त रमेश धुमाळ यांची नागपूर येथे बदली झाली असून, विशेष शाखेचे उपायुक्त शशिकांत सातव यांची छत्रपती संभाजीनगर येथे नियुक्ती करण्यात आली आहे. नांगरे पाटील यांच्या नियुक्तीमुळे नागपूर पोलीस दलाच्या नेतृत्वात नवे पर्व सुरू होणार आहे.







