

राज्यातील नागरिकांना मान्सूनच्या पुढील वाटचालीसाठी आणखी काही दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार मॉरिशस आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या वाऱ्यांमुळे मान्सून सध्या तळकोकणातच रेंगाळला असून त्याचा वेग मंदावला आहे.
दरम्यान, पुढील काही दिवस राज्यात कडक ऊन आणि उष्णतेचा तडाखा जाणवण्याचा इशारा देण्यात आला आहे. मान्सूनच्या सक्रियतेसाठी अनुकूल परिस्थिती बनण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भासह अनेक भागांत पावसाची तीव्रता कमी राहून तीव्र उन्हाचा चटका आणि उष्णतेची लाट कायम राहण्याचा अंदाज आहे. विदर्भातील काही भागांना उष्णतेच्या लाटेचा रेड आणि ऑरेंज अलर्टही देण्यात आला आहे. तापमानात वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांनी दुपारच्या वेळेत अनावश्यक बाहेर पडणे टाळावे तसेच पुरेसे पाणी पिऊन उष्माघातापासून बचाव करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
.







