
इंधन मागणीत उसळी; पेट्रोल-डिझेल विक्रीने मोडले विक्रम
June 9, 2026 1 Min Read
महाराष्ट्रात वाहतूक, उद्योग, कृषी आणि पर्यटन क्षेत्रातील वाढत्या हालचालींमुळे इंधनाची मागणी लक्षणीय वाढली आहे. बीपीसीएलच्या आकडेवारीनुसार, मे २०२६ मध्ये राज्यातील पेट्रोल विक्री १.३८ लाख मेट्रिक टनांवर पोहोचली असून, ती गेल्या वर्षाच्या तुलनेत ७.१ टक्क्यांनी वाढली आहे. डिझेल विक्रीतही १३.९ टक्क्यांची वाढ नोंदवली गेली. संबंधित जिल्ह्यात पेट्रोल विक्रीत १४.५२ टक्के, तर डिझेल विक्रीत १०.१४ टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यात बीपीसीएलने ३३,६३७ घरगुती आणि १,४२३ व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचा पुरवठा केला. मजबूत पुरवठा साखळीमुळे राज्यभर इंधनाचा अखंड पुरवठा सुरू असल्याचे कंपनीने म्हटले आहे.







