


मुंबई वेधशाळेचा अंदाज खरा ठरत रत्नागिरी जिल्ह्यात सोमवारी सायंकाळी जोरदार पावसाने हजेरी लावली. जिल्ह्यात मान्सून सक्रिय झाला असून ९, १० आणि ११ जूनसाठी हवामान विभागाने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. या काळात विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मागील २४ तासांत जिल्ह्यात सरासरी ७.४८ मिमी पावसाची नोंद झाली असून, राजापूरमध्ये सर्वाधिक २६.२८ मिमी पाऊस झाला. जोरदार पावसामुळे नागरिक, कार्यालयीन कर्मचारी आणि दुचाकीस्वारांची गैरसोय झाली. दरम्यान १२ जून रोजी जिल्ह्यासाठी कोणताही अलर्ट नसल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे.







