Skip to content
-
Marathi
Marathi
English
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
  • परिसरातील चालू घडामोडी
  • राज्यस्तरीय घडामोडी
  • ⁠देशभरातील बातम्या
  • आंतरराष्ट्रीय पडसाद
  • जागर विशेष
  • इतर
Close

Search

ताज्या बातम्या
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी रत्नागिरीतून उमेदवारी अर्ज दाखल
शहरातील परकार हॉस्पिटल मध्ये शॉर्ट सर्किट मुळे आग
यंदा १० जून पर्यंत मान्सूनच्या आगमनाची शक्यता नाही
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरी वाहतूक व्यवस्थापन बैठक संपन्न
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ
राज्यस्तरीय घडामोडी

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरी वाहतूक व्यवस्थापन बैठक संपन्न – 3

मे 25, 2026 2 Min Read
उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात शहरी वाहतूक व्यवस्थापन बैठक संपन्नरत्नागिरी- उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात 21 मे 2026 रोजी शहरातील वाहतूक व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने परिवहन विभाग, पोलीस विभाग व खासगी प्रवासी बस वाहतुकदार यांची बैठक पार पडली. या बैठकीला उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, राजवर्धन करपे, पोलीस उपनिरीक्षक, वाहतूक शाखा शरद घाग, औदुंबर ट्रॅव्हलचे हरिश्चंद्र चव्हाण, न्यू नॅशनल / श्री. स्वामी ट्रॅव्हलचे संदेश निकम, नवलाई ट्रॅव्हल ऋषिकेश कामत तसेच मोटार वाहन निरीक्षक आणि जिल्ह्यातील अन्य ट्रॅव्हल्सेच प्रतिनिधी उपस्थित होते. प्रवासी बसेस मुळे शहरात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि वाहतुकीचे व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने सदर बैठक आयोजित करण्यात आली. सुट्टीच्या हंगामामुळे रत्नागिरी ते मुंबई, पुणे प्रवासी वाहतुकीमध्ये वाढ झालेली आहे. याच सोबत शहरामध्ये रस्ते विकासाची कामे देखील चालू आहेत. त्यामुळे शहरात सायंकाळी मोठ्या प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढलेली असून वाहतूक कोंडी सारख्या समस्या उद्भवत आहेत. विशेषतः शहरातील प्रवासी बस थांब्यावर ही समस्या जास्त उद्भवत आहे. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी परिवहन विभाग, पोलीस विभाग व खाजगी बस वाहतुकदार यांनी संयुक्त सर्वेक्षण करून सुरक्षित बस थांबे निश्चित करण्यात येत आहेत. सदर थांब्यामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, प्रवाशांची सुरक्षितता आणि सोय होईल अश्याप्रकारे नियोजन करण्यात येत आहे. केवळ निश्चित थांब्यावरच बस थांबवावी इतर कुठेही अधे मध्ये बस थांबवता येणार नाही असे निर्देश बस वाहतुकदार यांना देण्यात आले. यासोबतच बस सुटण्याच्या वेळेचे नियोजन करण्यात येणार असून एकाच वेळी सर्व वाहतुकदार यांनी बसेस न सोडता टप्याटप्याने सोडाव्यात अश्या सूचना देण्यात आल्या. सदर बस चालकांनी बसेस थांबविताना वाहतुकीचा अंदाज घेऊन योग्यप्रकारे खबरदारी घेऊनच शिस्तीत बस थांबवाव्यात अश्या सूचना देण्यात आल्या. यासाठी सदर बस चालकांचे समुपदेशन करण्यात येणार आहे. बस धारकांनी वाहनाचे सर्व कागदपत्रे जसे नोंदणी प्रमाणपत्र, योग्यता प्रमाणपत्र, परवाना, विमा व प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र यांच्या वैधतेची तपासणी करावी तसेच बस मध्ये आपत्कालीन दरवाजा आणि अग्निशमन यंत्र सुस्थितीत असल्याची खात्री करावी अशा सुचना देण्यात आल्या. वाहतूक व्यवस्थापन आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सर्व नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन करण्यात येत आहे.
Author

dev_fe_gipl

Follow Me
Other Articles
Previous

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ – 2

Next

दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवसाची घेतली शपथ -4

No Comment! Be the first one.

    प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

    आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

    'जागर'…. च्या माध्यमातून कोकणातील स्थानिक घडामोडी, राज्यस्तरीय प्रश्न, देशभरातील महत्वाच्या बातम्या आणि निर्णय अस बरच काही एकच. व्यासपीठावर

    जागर बातम्या

    • परिसरातील चालू घडामोडी
    • राज्यस्तरीय घडामोडी
    • ⁠देशभरातील बातम्या
    • आंतरराष्ट्रीय पडसाद
    • जागर विशेष
    • इतर बातम्या
    • संपर्क साधा

    क्विक लिंक्स

    • गोपनीयता धोरण
    • अटी व शर्ती
    • अस्वीकरण

    संपर्क साधा

    पत्ता
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    ईमेल
    jagar.network@gmail.com

    • युटयूब
    • Instagram
    • Facebook

    डिस्क्लेमर:या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही. मजकुरासंदर्भात काही वाद निर्माण झाल्यास तो रत्नागिरी न्यायालयाअंतर्गत मर्यादित राहील

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech