

रत्नागिरी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयांच्या पायाभूत सुविधांना बळकटी देण्यासाठी विधानभवनात आढावा बैठक पार पडली. खेड, चिपळूण आणि गुहागर तालुक्यातील रुग्णालयांच्या विकासाबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले.
खेडमधील वावे येथे नवीन रुग्णालय इमारतीसाठी निधी व प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या. चिपळूणमधील रामपूर येथे नवीन इमारतीसाठी अतिरिक्त जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश देण्यात आले, तर गुहागर येथे जुन्या इमारतीऐवजी नवीन इमारतीचा प्रस्ताव सादर करण्यास सांगितले.
जिल्ह्यातील आरोग्य सुविधांच्या उभारणीसाठी विशेष प्रस्ताव मुख्यमंत्री यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
यावेळी आमदार भास्कर जाधव, आरोग्य विभागाचे आयुक्त संजय काटकर, आरोग्य सेवा संचालक डॉ. विजय कंदेवाड, सहसंचालक डॉ.सुनीता गोलाईत, सहसंचालक राजेंद्र भालेराव तसेच आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दूरदृश्य प्रणालीद्वारे रत्नागिरीचे जिल्हा शल्यचिकित्सक आणि कोल्हापूर विभागाचे आरोग्य उपसंचालक सहभागी झाले होते.







