
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षा आता वर्षातून दोन वेळा होणार
June 26, 2026 1 Min Read

महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट-अ व गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा, महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा पूर्व परीक्षा आणि महाराष्ट्र गट-क सेवा पूर्व परीक्षा या वर्षातून दोन किंवा अधिक वेळा घेण्याबाबत प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉राज्यसेवा गट-अ/ब, महाराष्ट्र गट-ब आणि गट-क पूर्व परीक्षा आता वर्षातून २ किंवा अधिक वेळा घेतल्या जाणार.
👉सर्व पूर्व परीक्षा CBT (Computer Based Test) पद्धतीने होतील.
👉एकापेक्षा जास्त सत्रे झाल्यास गुणांचे Normalization करण्यात येईल.
👉उमेदवार कोणत्याही एका पूर्व परीक्षेत पात्र ठरल्यास त्या वर्षाच्या मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरेल.
👉मुख्य परीक्षा मात्र वर्षातून एकदाच होईल.
👉मुख्य परीक्षेसाठी पात्रता ठरविण्याची सविस्तर कार्यपद्धती स्वतंत्रपणे जाहीर केली जाईल.
👉ही नवीन कार्यपद्धती सन २०२७ च्या पूर्व परीक्षांपासून लागू होणार आहे.
गट क २०२६ पदनिहाय जागा
▪️ सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक – ४६१ जागा
▪️ महसूल सहाय्यक – ४५२ जागा
▪️ सहकारी संस्था – लिपिक टंकलेखक (SR) – ३३२ जागा
▪️ पशुधन पर्यवेक्षक – ३३२ जागा
▪️ कर सहाय्यक – २८२ जागा
▪️ लिपिक-टंकलेखक (मंत्रालयीन विभाग) – २४३ जागा
▪️ पुरवठा निरीक्षक – २२६ जागा
▪️ लेखा व कोषागार संचालनालय – लिपिक टंकलेखक – १०२ जागा
⚠️ टीप: वरील जागा सद्यस्थितीतील असून, अंतिम जाहिरात प्रसिद्ध होईपर्यंत आणखी जागावाढ होण्याची शक्यता आहे.







