Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
मुकुल माधव विद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा; कराटे स्पर्धेत विद्यार्थ्यांची ९ पदकांना गवसणी!
रत्नागिरीत ‘स्वदर्पण’ केंद्राच्या माध्यमातून मानसिक आरोग्याला नवी दिशा!
जिल्हा क्रीडा अधिकाऱ्यांच्या बॉलवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘चौकार’
रत्नागिरीच्या समुद्रात युवाशौर्याचा जागर
नांदिवडे गॅस टर्मिनलच्या स्थलांतरासाठी ३० ऑक्टोबरची डेडलाइन; ग्रामस्थांचा उपोषणाचा इशारा
आरोपांमागचा खरा सूत्रधार कोण? उदय सामंतांच्या विधानाने चर्चेला उधाण
Breaking News

डोंगर-दऱ्यांचे खडतर आव्हान पेलत महावितरणचे ‘मिशन म्हाप्रळ’ फत्ते

October 22, 2026 2 Min Read

रत्नागिरी : निसर्गाचे रौद्र रूप, पायाखाली निसरड्या कडांचे खोल उतार आणि घनदाट डोंगराळ भाग… अशा सर्व प्रतिकूल परिस्थितीवर मात करत महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कर्तव्यनिष्ठेची एक अनोखी मिसाल घालून दिली आहे. मंडणगड तालुक्यातील बोलाडेवाडी ते चिंचाळी धरण या अत्यंत दुर्गम भागात दोन दिवस रात्रंदिवस युद्धपातळीवर धावपळ करून अखेर म्हाप्रळ आणि पंचक्रोशीतील वाड्यांचा अंधार दूर करण्यात महावितरणला यश आले. तब्बल ४८ तासांनंतर, २१ ऑक्टोबर रोजी रात्री वीजपुरवठा पूर्ववत सुरू झाला आणि संपूर्ण परिसराने सुटकेचा निश्वास टाकला.

     १९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी म्हाप्रळ परिसराची वीज अचानक खंडित झाली. तपासणीअंती ११ के.व्ही. उच्चदाब वाहिनीचे तब्बल ११ विजेचे खांब जमीनदोस्त झाल्याचे समोर आले. हे सर्व खांब ज्या भागात कोसळले होते, तो भाग म्हणजे बोलाडेवाडी ते चिंचाळी धरणाचा अत्यंत खडतर आणि दुर्गम टापू. तिथे वाहने पोहोचणे अशक्य, धोकादायक वळणे आणि अंगावर येणारा तीव्र उतार! अशा ठिकाणी नवे जड पोल, तारा आणि इतर साहित्याची ने-आण करणे हे केवळ कर्मचाऱ्यांसाठीच नव्हे, तर यंत्रसामग्रीसाठीही मोठे आव्हान होते.

जिद्दीने उभे केले ११ खांब

परिस्थिती कितीही कठीण असली तरी ग्राहकांना लवकरात लवकर दिलासा देणे हेच एकमेव ध्येय डोळ्यासमोर ठेवून महावितरणचे अधिकारी, कर्मचारी आणि कंत्राटदारांचे पथक थेट मैदानात उतरले. खांद्यावरून ओझे वाहत, तांत्रिक अडचणींना सामोरे जात या पथकाने अवघ्या दोन दिवसांत कोसळलेले सर्व ११ खांब बदलून नवी वीजवाहिनी उभारली. कष्टाची शर्थ करून सलग दोन दिवस घेतलेल्या या मेहनतीला अखेर यश आले.

सहकार्याची वज्रमूठ: कंत्राटदार आणि ग्रामस्थांचे मोलाचे योगदान

    हे अशक्यप्राय काम वेळेत पूर्ण होण्यामागे सामूहिक प्रयत्नांची मोठी ताकद उभी राहिली. या मोहिमेत महावितरणचे कंत्राटदार M/s AG Industries चे श्री. अलदार व श्री. बिजापूरे, ‘साहिल इलेक्ट्रिकल’चे रुपेश सपकाळ तसेच ‘M/s क्रांती इलेक्ट्रिकल्स’चे महेंद्र जगताप यांनी विशेष पुढाकार घेत मोलाचे सहकार्य केले. याशिवाय लघुदाब वाहिनी सुरळीत करण्यासाठी श्री. पवार (श्रवण इलेक्ट्रिकल), सुमेद वैद्य, पंकज घाग (यश इलेक्ट्रिकल), श्री. मोडक (श्री इलेक्ट्रिकल) आणि ३३ के.व्ही. पालगड वाहिनीसाठी श्री. पिंगळे (ऋषिकेश इलेक्ट्रिकल) यांनी खांद्याला खांदा लावून मदत केली.

   या मोहिमेत सर्वात कौतुकास्पद ठरली ती म्हाप्रळच्या स्थानिक ग्रामस्थांची साथ. या संकटाच्या काळात ग्रामस्थ स्वतःहून पुढे आले आणि कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी मदत केली. स्थानिक लोकांचे हे सहकार्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवणारे ठरले.

समन्वयातून साधली यशस्वी बाजी

महावितरणचे अधिकारी, कर्मचारी, कंत्राटदार आणि स्थानिक गावकरी यांच्यातील अजोड समन्वय व सांघिक भावनेमुळेच हे महाकठीण काम वेळेत तडीस गेले, अशा शब्दांत उपकार्यकारी अभियंता, मंडणगड यांनी सर्वांप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. महावितरणच्या या तत्पर आणि धाडसी कामगिरीचे सध्या म्हाप्रळ परिसरातून भरभरून कौतुक होत आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

‘जागर’ परिवाराकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा !

Next

दिवाळीनिमित्त शाळांना १३ दिवसांची सुट्टी; विद्यार्थ्यांमध्ये उत्साह!

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech