

आशियाई क्रीडा स्पर्धेत भारत-अफगाणिस्तान क्वार्टर फायनल सामना पावसामुळे टॉसही न होता रद्द झाला. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत वर असल्याने भारताने थेट सेमीफायनलमध्ये प्रवेश केला.
याचप्रमाणे पाकिस्तान-हाँगकाँग सामना देखील पावसामुळे रद्द झाल्याने पाकिस्तानलाही सेमीफायनलचे तिकीट मिळाले.
आता 1 ऑक्टोबरला भारताचा सामना श्रीलंका/नेपाळ विजेत्याशी, तर पाकिस्तानचा सामना बांगलादेश/मलेशिया विजेत्याशी होणार आहे.
दोन्ही संघ जिंकल्यास पहिल्यांदाच गोल्ड मेडलसाठी भारत-पाकिस्तान आमनेसामने येऊ शकतात.







