
राज्यात पावसाचा जोर वाढणार, नव्या सरींमुळे पिकांना मिळणार जीवनदान
September 2, 2026 1 Min Read

महाराष्ट्रात ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान पावसाचा जोर पुन्हा वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. ऑगस्ट महिन्यात अपेक्षित पाऊस न पडल्यामुळे राज्यात पावसाची तूट निर्माण झाली असून विशेषतः मराठवाडा आणि विदर्भाला त्याचा मोठा फटका बसला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, कमी दाबाचा पट्टा आणि वाऱ्याची द्रोणी रेषा सक्रिय झाल्यामुळे राज्यातील हवामानात बदल होत आहे. यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यातील अनेक भागांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
या पावसामुळे कोरड्या पडलेल्या पिकांना दिलासा मिळणार असून शेतकऱ्यांची चिंता काही प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.







