

पुण्यातील कोंढवा परिसरात अमली पदार्थविरोधी पथकाने (ANTF) मोठी कारवाई करत सुमारे अडीच किलो गांजा जप्त केला आहे. या कारवाईदरम्यान गांजा खरेदी करण्यासाठी आलेल्या तब्बल 30 जणांवरही पोलिसांनी कारवाई केली असून त्यांची सखोल चौकशी सुरू आहे.
कोंढवा परिसरात गांजा विक्री सुरू असल्याची माहिती मिळाल्यानंतर ANTF पथकाने सापळा रचून छापा टाकला. या छाप्यात मोठ्या प्रमाणात गांजा जप्त करण्यात आला असून संबंधित तस्करी साखळीचा तपास सुरू आहे.
कारवाईच्या वेळी अनेक जण गांजा खरेदी करण्यासाठी घटनास्थळी आले होते. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेतले असून ते केवळ ग्राहक आहेत की मोठ्या नेटवर्कशी संबंधित आहेत, याचा तपास सुरू आहे.
या प्रकरणात गांजा पुरवठा कुठून होत होता, मुख्य तस्कर कोण आहेत आणि पुण्यातील इतर भागांमध्ये या नेटवर्कचा विस्तार किती आहे, याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे.







