
पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत (PMFBY) नावनोंदणीसाठी वाढवण्यात आलेली 10 ऑगस्ट ही अंतिम मुदत आज संपत आहे. तांत्रिक अडचणी, प्रलंबित कागदपत्रे आणि इतर वैयक्तिक कारणांमुळे अनेक शेतकरी नोंदणी पूर्ण करू शकले नसल्याने 31 जुलैची अंतिम तारीख पुढे ढकलण्यात आली होती.
संबंधित विभागाकडून शेतकऱ्यांना आजच अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मराठवाडा विभागात या योजनेला मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले असून, कोकणात मात्र सहभाग तुलनेने कमी असल्याची माहिती समोर आली आहे.
पीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी संरक्षण कवच म्हणून कार्य करते. नैसर्गिक आपत्ती, दुष्काळ, पूर, गारपीट यांसारख्या संकटांमुळे पिकांचे नुकसान झाल्यास आर्थिक भरपाई देण्याची तरतूद या योजनेत आहे. त्यामुळे अनिश्चित हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेणे अत्यंत आवश्यक मानले जात आहे.
शेतकरी PMFBY अधिकृत वेबसाइट, PMFBY मोबाईल ॲप किंवा जवळच्या कॉमन सर्व्हिस सेंटर (CSC) मार्फत अर्ज करू शकतात. संबंधित अधिकाऱ्यांनी शेवटच्या दिवशी गर्दी टाळण्यासाठी शक्य तितक्या लवकर प्रक्रिया पूर्ण करण्याचा सल्ला दिला आहे.
आहे.







