

रत्नागिरी शहरात ऑनलाइन फसवणुकीची गंभीर घटना समोर आली असून बँक ऑफ इंडिया, मारुती मंदिर शाखेतील खात्यातून ५,८६,००९ रुपयांची रक्कम अज्ञात व्यक्तीने परस्पर काढल्याचे उघड झाले आहे.
ही घटना २५ जुलै रोजी सायंकाळी ६:३६ ते ७:३७ या कालावधीत घडली. शांतीनगर परिसरातील खातेदाराच्या खात्यावरून ऑनलाइन व्यवहाराद्वारे ही रक्कम काढण्यात आली.
याप्रकरणी ३१ जुलै २०२६ रोजी रत्नागिरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी राजेश सोहनी यांनी तक्रार दिली असून संबंधित खाते त्यांच्या परिचिताचे असल्याची माहिती आहे.
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरुद्ध भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४), माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (ड) तसेच जुन्या भारतीय दंड संहितेच्या (भा.द.वि.) कलम ४२० अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेनंतर शहर पोलीस तपास करत असून नागरिकांनी ऑनलाइन व्यवहार करताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







