Skip to content
-
English
English
Marathi
Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Jagar News Jagar News Jagar News
Jagar News Jagar News Jagar News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
  • Breaking News
  • State Level News
  • Nationwide News
  • International News
  • Jagar Special
  • Other News
Close

Search

Breaking News
केंद्राच्या लेखी आश्वासनानंतर सोनम वांगचुक यांचे 26 दिवसांचे उपोषण अखेर समाप्त
ग्रामीण जनतेच्या वेळेची अन् पैशांची बचत करण्यासाठी ‘महाराजस्व समाधान शिबीर’ – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
रत्नागिरी जिल्ह्यासाठी ९ हजार १९० कोटींचा वार्षिक पत आराखडा
राज्यात पुन्हा मुसळधार पावसाची एन्ट्री; शेतीला दिलासा
धामणसेत ‘एक झाड – एक पुस्तक’ उपक्रम; ९०० झाडांचे संवर्धन
घाटमाथ्यावर पुन्हा पावसाचा जोर; ताम्हिणीत 200 मिमी नोंद
Breaking News

डॉक्टर मारहाण प्रकरण : नगरसेवक रमेश म्हात्रे अटकेत, प्रकृती बिघडल्याने ICU मध्ये दाखल

July 9, 2026 2 Min Read

  कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या (KDMC) शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांना मारहाण केल्याप्रकरणी मुख्य आरोपी असलेले शिंदेसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेनंतर वैद्यकीय तपासणीदरम्यान त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याने त्यांना तातडीने आयसीयूमध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

पोलिसांनी अटकेनंतर नियमानुसार रमेश म्हात्रे यांना कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेले होते. मात्र तपासणीदरम्यान त्यांना हृदयाशी संबंधित त्रास जाणवू लागल्याने डॉक्टरांनी तातडीने उपचार सुरू केले. त्यानंतर अधिक उपचारासाठी त्यांना ठाणे सिव्हिल रुग्णालयात हलवण्यात आले असून सध्या ते आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे बारकाईने लक्ष असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ KDMCच्या रुक्मिणीबाई आणि शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टरांनी कामबंद आंदोलन पुकारले. आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत काही काळ वैद्यकीय सेवा बंद ठेवण्यात आल्या. या आंदोलनामुळे पोलिसांसमोर आरोपीची वैद्यकीय तपासणी अन्य रुग्णालयात करण्याचे आव्हान निर्माण झाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार, शास्त्रीनगर रुग्णालयात कर्तव्यावर असलेल्या एका डॉक्टरांना रमेश म्हात्रे यांनी फोन केला होता. मात्र डॉक्टर उपचारात व्यस्त असल्याने त्यांनी फोन उचलला नाही. यामुळे संतप्त झालेल्या म्हात्रे यांनी समर्थकांसह रुग्णालयात जाऊन डॉक्टरांशी वाद घालत मारहाण केल्याचा आरोप आहे.

या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. सरकारी रुग्णालयात घुसून कर्तव्यावर असलेल्या डॉक्टरांवर हल्ला झाल्याने वैद्यकीय क्षेत्रातून तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे.

डॉक्टरांच्या तक्रारीवरून विष्णुनगर पोलीस ठाण्यात रमेश म्हात्रे आणि त्यांच्या समर्थकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्य बजावण्यापासून रोखणे, मारहाण करणे, धमकावणे आणि सरकारी कामात अडथळा आणणे यांसारख्या गंभीर कलमांखाली पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

दरम्यान, विविध डॉक्टर संघटना आणि निवासी डॉक्टरांनी या घटनेचा तीव्र निषेध नोंदवला आहे. डॉक्टरांवरील वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच रुग्णालयांमध्ये डॉक्टरांना प्रभावी सुरक्षा देण्याची मागणी करण्यात येत आहे.

Download PDF
Author

Jagar News Admin

Follow Me
Other Articles
Previous

पुणेकरांनो सतर्क रहा! खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स विसर्ग

Next

रत्नागिरीकरांसाठी मोठी बातमी! ३० खाटांचे ‘एकात्मिक आयुष रुग्णालय’ मंजूर

No Comment! Be the first one.

    Leave a Reply Cancel reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    'Jagar'...local developments in the Konkan region, state-level issues, significant national news, key decisions, and much more all on a single platform...

    Jagar Links

    • Breaking News
    • State Level News
    • Nationwide News
    • International News
    • Jagar Special
    • Other News
    • Contact Us

    Quick Links

    • Privacy Policy
    • Terms & Conditions
    • Disclaimer

    Contact Us

    Address
    Jagar media, shop no. 122, Arihant mall, Opposite Ratnagiri ST stand ,Ratnagiri-415612

    Email
    jagar.network@gmail.com

    • YouTube
    • Instagram
    • Facebook

    Disclaimer: The Editor/Director does not necessarily agree with the opinions expressed in the news reports and articles published on this internet news channel and online web portal. In the event of any dispute arising regarding the content, jurisdiction shall be limited to the courts of Ratnagiri.

    Copyright 2026 — Jagar News. All rights reserved. Developed by Gadre Infotech