
पुणेकरांनो सतर्क रहा! खडकवासला धरणातून 27 हजार क्युसेक्स विसर्ग
July 8, 2026 1 Min Read

खडकवासला धरणातून मुठा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढवून सुमारे 27,203 क्युसेक्स करण्यात आला आहे. पावसाच्या प्रमाणानुसार हा विसर्ग कमी-जास्त करण्याची शक्यता असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली आहे.
धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पाणीपातळीत झपाट्याने वाढ होत असून, खबरदारीचा उपाय म्हणून विसर्ग वाढवण्यात आला आहे. नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये तसेच जनावरे व साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
दरम्यान, पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे नद्या दुथडी भरून वाहत असून, हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे. घाटमाथ्यावर काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.







