
गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात अभिनय कार्यशाळेला उत्स्फूर्त प्रतिसाद
June 29, 2026 1 Min Read
रत्नागिरीतील गोगटे-जोगळेकर महाविद्यालयात परफॉर्मिंग आर्ट्स विभागांतर्गत प्रा. डॉ. मिलिंद इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली अभिनय कार्यशाळा पार पडली. सहज आणि वास्तववादी अभिनय तंत्र, कल्पकता वाढवणाऱ्या ॲक्टिव्हीटी आणि संवादातून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले.
राष्ट्रीय नाट्य विद्यालयाचे माजी विद्यार्थी असलेले डॉ. इनामदार यांनी विद्यार्थ्यांना अभिनयातील बारकावे समजावले. कार्यशाळेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून महाविद्यालयातून अधिक कलाकार घडावेत, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.







