महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्यावतीने 28 जून 2026 रोजी राज्यभरात 1028 केंद्रांवर शिक्षक पात्रता परीक्षा (TET) घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या घटनेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
27 जून रोजी पहाटे गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे पोलिसांनी छापा टाकला. काही संशयित व्यक्तींकडे TET परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेशी साधर्म्य असलेली कागदपत्रे आढळून आली. यानंतर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकाऱ्यांना तातडीने बोलावून पडताळणी करण्यात आली. प्राथमिक तपासात संबंधित कागदपत्रे प्रश्नपत्रिकेशी मिळतीजुळती असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी भिवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता आणि परीक्षा पूर्णतः पारदर्शक व निष्पक्षपणे पार पडावी यासाठी 28 जूनची TET परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे.
परीक्षेबाबतची अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच जाहीर करण्यात येणार आहे.