
रत्नागिरी जिल्ह्यात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता; काही भागांत जोरदार सरींचा इशारा
June 26, 2026 1 Min Read

रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणातील बहुतांश भागांत आज पाऊस पडण्याची शक्यता असून, तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच काही ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
आज सकाळपर्यंत नोंदविलेले पर्जन्यमान (मिमी) :
मंडणगड – 3.75
दापोली – 4.85
खेड – 1.71
चिपळूण – 1.22
गुहागर – 23.80
संगमेश्वर – 19.75
रत्नागिरी – 49.33
लांजा – 8.80
राजापूर – 14.36
जिल्ह्यात सर्वाधिक 49.33 मिमी पावसाची नोंद रत्नागिरी येथे झाली असून, त्यापाठोपाठ गुहागर येथे 23.80 मिमी आणि संगमेश्वर येथे 19.75 मिमी पाऊस झाला आहे. हवामान विभागाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.







