
केतन हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम वकील; मुख्यमंत्र्यांची कुटुंबीयांना भेट
June 26, 2026 1 Min Read

पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणाला वेग आला असून हे प्रकरण आता न्यायालयात दाखल झाले आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम हे केतनच्या कुटुंबीयांचे प्रतिनिधित्व करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केतनच्या कुटुंबीयांची भेट घेत दोषींना कठोर शिक्षा देण्याचे आश्वासन दिले. तसेच जलदगती न्यायालय स्थापन करण्याची आणि निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणीही मान्य करण्यात आली आहे.







