
अखेर संपूर्ण महाराष्ट्रात मान्सूनची एंट्री; मुसळधार पावसाचा इशारा
June 25, 2026 1 Min Read
यंदा सुमारे 9 दिवसांच्या विलंबानंतर मान्सूनने अखेर संपूर्ण महाराष्ट्र व्यापला आहे. राज्यभर पावसाने दमदार हजेरी लावली असून पुढील काही दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे, सातारा, धाराशिव, लातूर, यवतमाळ आणि चंद्रपूर जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे, तर कोकणासह अनेक भागांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत मुंबई, कोकण, नाशिक, जळगाव, परभणी, जालना, नागपूर आदी जिल्ह्यांत जोरदार पाऊस झाला.
राज्यात रविवारपर्यंत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असून नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी अधिकृत हवामान अंदाजावर लक्ष ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







