

रत्नागिरी : खेडशी परिसरात रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या दुचाकीला टँकरने मागून धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात खालगाव येथील दुचाकीस्वार महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी याच परिसरात एक रिक्षा पलटी झाल्याने मोठी गर्दी जमली होती. त्याच दरम्यान, हातखंबा दिशेने रत्नागिरीकडे येणाऱ्या दुचाकीला मागून टँकरने जोरदार धडक दिली. या धडकेनंतर टँकरही पलटी झाला.
अपघातात दुचाकीवरील दांपत्य गंभीर जखमी झाले असून महिलेला जागीच मृत घोषित करण्यात आले. जखमी व्यक्तीवर उपचार सुरू आहेत. पुढील तपास पोलीस करत आहेत.







