
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना (उबाठा) पक्षात पुन्हा एकदा फूट पडल्याचे वृत्त आहे. पक्षाच्या ९ पैकी ६ खासदारांनी स्वतंत्र गट स्थापन करण्याची प्रक्रिया पूर्ण केली असून त्यांनी ओम बिर्ला यांची भेट घेतल्याचे सांगितले जात आहे. हे खासदार १९ जून रोजी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या हालचालींना रोखण्यासाठी शिवसेना (उबाठा)ने सर्व ९ खासदारांना दिल्लीतील बैठकीसाठी व्हीप बजावला असून कायदेशीर पर्यायांचाही विचार सुरू आहे.
स्वतंत्र गटातील खासदार: संजय देशमुख, संजय जाधव, नागेश पाटील अष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे, ओमराजे निंबाळकर आणि संजय दिना पाटील.
ठाकरेंसोबत राहिलेले खासदार: अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाझे.







