

क्विक-कॉमर्स कंपनी Blinkit सध्या ‘फास्ट डिलिव्हरी’पेक्षा वादग्रस्त डिलिव्हरीमुळेच जास्त चर्चेत आहे. मुंबईतील कुर्ला वेस्टमध्ये दुधाच्या पॅकेट्सवरील एक्सपायरी डेट पुसून विकल्याचा आरोप सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला आहे. “१० मिनिटांत सेवा देणारी” आता “वादग्रस्त डिलिव्हरी” देत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
अकोल्यात ग्राहकाला ऑनलाईन ऑर्डर केलेली दुर्गंधीयुक्त मटकी मिळाल्याची तक्रार समोर आली. तर निकृष्ट दर्जाच्या अंड्यांच्या विक्रीच्या आरोपांनंतर Food Safety and Standards Authority of India ने ब्लिंकिटला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.
दरम्यान, सोशल मीडियावर या प्रकरणांवर जोरदार मीम्स आणि प्रतिक्रिया उमटत असून, “फास्ट डिलिव्हरीपेक्षा आता फास्ट क्वालिटी चेक व्हावी” अशी मागणीही काही युजर्स करत आहेत. कंपनीच्या गुणवत्ता नियंत्रणावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.







