
महाराष्ट्र शासनाने २०१७ च्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना आणि २०१९ च्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र असूनही वंचित राहिलेल्या सुमारे ५ लाख ९० हजार शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा मोठा निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेतला आहे. अतिरिक्त ५.७५ लाख शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट केल्यास सुमारे ₹५,२७५ कोटींची आणखी गरज भासणार आहे.







