


नैर्ऋत्य मान्सून दक्षिण कोकणात दाखल झाला असून सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये ९ जूनपर्यंत मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे. मात्र त्यानंतर १५ जूनपर्यंत राज्यातील पावसाचा जोर आणि मान्सूनची प्रगती मंदावण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे कृषी व आपत्ती व्यवस्थापन विभागाने आवाहन केले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पाऊस स्थिर झाल्यानंतरच पेरणी करण्याचा सल्ला देत दुबार पेरणी टाळण्यासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.







