
संगमेश्वर तालुक्यातील एका खासगी वनक्षेत्रात रॉयल बंगाल वाघाची उपस्थिती कॅमेरा ट्रॅपमध्ये नोंदवली गेली आहे. तब्बल १८ वर्षांच्या वनसंवर्धन प्रयत्नांनंतर मिळालेली ही नोंद सह्याद्रीतील परिसंस्थेच्या पुनरुज्जीवनाचे महत्त्वाचे संकेत मानली जात आहे.
वन्यजीव अभ्यासकांच्या मते, वाघाचे अस्तित्व हे जंगलाच्या सुदृढ आणि संतुलित परिसंस्थेचे प्रतीक आहे. एईआरएफच्या संवर्धन करारांतर्गत जतन करण्यात आलेल्या खासगी जंगलात हा वाघ आढळला असून, सुरक्षेच्या कारणास्तव स्थान गुप्त ठेवण्यात आले आहे. या घटनेमुळे सह्याद्रीतील व्याघ्र संवर्धन आणि खासगी वनक्षेत्रांच्या संरक्षणाला नवी दिशा मिळाल्याचे मानले जात आहे.







