

गुजरात उच्च न्यायालयाने 2008 च्या अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील 38 दोषींना सुनावलेली फाशीची शिक्षा कायम ठेवली आहे. तसेच, 11 जणांच्या जन्मठेपेची शिक्षा देखील न्यायालयाने कायम ठेवली.
26 जुलै 2008 रोजी अहमदाबादमध्ये 70 मिनिटांत 21 ठिकाणी झालेल्या बॉम्बस्फोटांत 56 जणांचा मृत्यू झाला होता, तर सुमारे 200 जण जखमी झाले होते. या हल्ल्यांमध्ये रुग्णालयांनाही लक्ष्य करण्यात आले होते.
न्यायमूर्ती ए. वाय. कोगजे आणि समीर दवे यांच्या खंडपीठाने सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाखल सर्व अपील फेटाळून लावत हा महत्त्वाचा निकाल दिला.







